राजकीय
म्हणून पाहिजे फडणवीस सरकार- आमदार राणे

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि त्यातही शिवसेनेवर टीका करायची एकही संधी खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणें आणि आमदार नितेश राणे सोडत नाहीत.
आमदार राणे यांनी नुकतेच ट्विट केले आहे. त्यात राणे म्हणतात, कर्नाटकच्या भाजप सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली. ५० कोटींची तरतूद पण केली. आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करून टाकले. म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार.
मराठा आरक्षणाचा निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री असताना झाला होता. हा संदर्भ राणे यांनी या निमित्ताने दिला आहे शिवाय फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार परत यावे असे सूचित केले आहे.







