कोथरुड

कोथरुड येथील भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव रद्द

पुणे : कोथरूड येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे सालाबाद प्रमाणे रविवार दि. २५ एप्रिल २०२१ रोजी होणारा भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. Bhagwan Mahavir Janmakalyanak Festival at Kothrud canceled

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच शासकीय आदेशाचे व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून यावेळी होणारे ध्वजारोहण, नित्य अभिषेक, चढावे, पूजन महाभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक अहवाल वाचन, जन्मोस्तव-पाळणा, महाप्रसाद इ. विविध सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

IMG 20210223 WA0156

भ.महावीर भगवान यांनी उपदेश दिलेल्या अहिंसा, शांती व संयम या तत्वांवर चालण्याची सध्या नितांत गरज आहे. जेव्हा जेव्हा देशावर गंभीर संकट ओढवलं, तेव्हा तेव्हा जैन समाज खंबीरपणे सढळ हाताने, राष्ट्राला, राज्याला अर्थातच समाजाला मदत करायला उभा ठाकलेला असतो जैन सुपुत्र वीर भामाशाह ज्यांनी देशासाठी संपुर्ण संपत्तीच्या त्याग केला त्यांच्या देशभक्तीचा आदर्श आम्हा संपूर्ण जैन समाजाच्या डोळ्यासमोर आहे. देशाच्या ह्या संकट काळी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे हीच आमची खरी देशभक्ती आहे, तर भ. महावीरांप्रतीही खरी भक्ति आहे.

सामाजिक जाणीव, सामाजिक भावना आदी गोष्टी लक्षात घेऊन, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिरातील पंडितजी फक्त धार्मिक विधी महावीरजन्म कल्याणक च्या दिवशी करतील. अशी माहिती भगवान महावीर मंडळाचे ट्रस्टी यांनी कळविले आहे. दिगंबर जैन समाजातील सर्व लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close