पुणे शहर
‘रामरक्षारहस्य’या विषयावर व्याख्यान

पुणे : भारतीय जनता पार्टीचे सह कार्यालयीन मंत्री व प्रभारी मुळशी तालुका भाजप राजेश कुलकर्णी व रसिका राजेश कुलकर्णी यांनी रामनवमीच्या पावन पर्वावर ‘रामरक्षारहस्य’या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

आत्ताची कोरोनाजन्य परिस्थिती पाहता हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता चिंचवडच्या सौ. प्रिया. श्रीनिवास जोग ह्या होत्याा , त्यांनी रामरक्षेचे महत्त्व खुप छान व सोप्या शब्दात समजावून सांगीतले. या कार्यक्रमाला जवळपास दीडशेहून अधिक श्रोते ऑनलाइन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेणुका अमित कुलकर्णी यांनी केले तर आभार संजय पटवर्धन यांनी मानले.
एकंदरीत हा छोटासा कार्यक्रम श्रोत्यांच्या कौतुकास पात्र ठरला.



