प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

कोथरुड : कोथरुड, कर्वेनगर व वारजे परिसरात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात कोविड नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला. चौकाचौकात सुरू असलेल्या देश भक्तीपर गीतांनी सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते.

सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सुनील भागवत यांचा सन्मान !
विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व प्रदीप धुमाळ यांच्या शिफारशीनुसार सुनील मोरेश्वर भागवत यांना सामाजिक क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
वारजेतील गंगाबाई धुमाळ उद्यानात प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. सुनिल भागवत हे तीस वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छतेबाबत शिबीर आयोजित करून परिसराची स्वच्छता कशी राहील याबाबत जनजागृती, प्रचार व प्रसार करीत आहेत. रोज सकाळी सहा ते नऊ यावेळेत श्रीराम सोसायटी ते शनिमंदीर हा परिसर स्वच्छ करीत आहेत. “स्वच्छतेत जगुया सारे, मन शुध्द करूया सारे” हे बोध वाक्य त्यांनी स्वतः तयार करून या उक्तीनुसार कार्य करीत आहेत. हे कार्य पाहूनच त्यांना महापालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.



विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक मित्र मंडळात मेजर विशाल गाडेकर व निवृत्त मेजर श्रीहरी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
कर्वेनगर येथील मातोश्री कॉलनी मधील श्री विठ्ठल-रूक्मिणी सार्वजनिक मित्र मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक उत्साहात साजरा करण्यात आला. देश सेवेसाठी कार्यरत असलेले मेजर विशाल गाडेकर व निवृत्त मेजर श्रीहरी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चेतन भालेकर, भगवान चव्हाण, राजाभाऊ भालेकर, सूर्यकांत शिंदे, रामचंद्र वालगुडे, गुलाब भुजबळ, राहुल भालेकर मंगेश जगताप, रोहित चव्हाण, उत्कर्ष दिघे, मंडळाच्या सर्व सभासद, व कार्यकर्ते उपस्थित होते.






श्रीमंत संत तुकाराम महाराज मंडळ कर्वेनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे सदस्य ध्वजारोहन प्रसंगी उपस्थित राहून राष्ट्रध्वजला मानवंदना दिली.






