महर्षी कर्वेंच्या कर्वेनगर भूमीत बढेकर ग्रुपच्या ‘श्रीकुंज’ बांधकाम प्रकल्पाचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन..

पुणे : महिलांच्या उन्नतीसाठी व शिक्षणासाठी अविरतपणे काम करणाऱ्या भारतरत्न महर्षी कर्वेंच्या कर्वेनगर भूमीत बढेकर ग्रुपच्या श्रीकुंज या बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विधिवत पूजा करत करण्यात आले.
यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बढेकर ग्रुपचे संस्थापक केशव बढेकर, चेअरमन प्रवीण बढेकर, आनंद पवार, निलेश कोंढाळकर, उपस्थित होते. मोनिका मोहोळ, ज्योत्सना पवार, मीना पवार, माधवी चौडे, रेखा बढेकर, अलका बढेकर या महिलांच्या हस्ते या बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रवीण बढेकर म्हणाले, महर्षी कर्वे यांनी महिलांना शिक्षण मिळावे, समाजातील अनिष्ट चालीरीती बंद व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. याच कर्वेनगर भूमीत त्यांनी मुलींना शिक्षणाची दारे उघडी केली. आज कर्वेनगर मध्ये असलेल्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन मुलींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आर्किटेक्चर क्षेत्रात ही या संस्थेतील मुली आपला ठसा उमटवत आहेत. आणि म्हणूनच ज्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले त्यांच्या भूमीत सुरू करत असलेल्या या बांधकाम प्रकल्पाचे काम आम्ही महिलांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरू केले आहे.
बढेकर पुढे म्हणाले, बढेकर ग्रूपचे कोथरूड भागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. आता आम्ही कोथरूडच्या बाहेरही विस्तार करत असून कर्वेनगर, स्वारगेट, औंध, प्रभात रोड, आपटे रोड, बिबवेवाडी या भागात बांधकाम प्रकल्प सुरू होत आहेत. ज्यावेळी कर्वेनगर मधील याठिकाणी बढेकर ग्रुप कमींग सून हा बोर्ड लावला त्यावेळीच या प्रकल्पातील निम्म्या सदनिका विकल्या गेल्या तर आज भूमिपूजन होईपर्यंत प्रकल्पातील सर्व सदनिकांचे बुकिंग फुल झाले असून बढेकर ग्रूपवर असलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करणे हे बढेकर ग्रूपचे वैशिष्ठ्य आहे. हे ही काम त्याच पद्धतीने पूर्ण केले जाईल. यावेळी त्यांनी कर्वेनगरमध्ये मित्राच्या घरी सुट्टीच्या दिवसांमध्ये घालवलेल्या वेळेतील आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाटे यांनी ‘या नव नवल नयनोत्सवा’ या मानापमान संगीत नाटकातील पद सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर गुळाचा गणपती या चित्रपटातील इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.

बढेकर ग्रूपकडेच घर का घ्यावे..
नाते विश्वासाचे हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या बढेकर ग्रूपने आजपर्यंत आपल्या अनेक ग्राहकांना आनंदाच्या वास्तू निर्माण करून दिल्या आहेत. आणि त्या ग्राहकांबरोबर त्यांचे विश्वासाचे नाते मजबुतपणे आजही टिकून आहे, आणि याच विश्वासाच्या जोरावर बढेकर ग्रूपचे अनेक मोठे गृहप्रकल्प कोथरुडमध्ये आज सुरू आहेत, आणि आता कर्वेनगर मध्ये ही ते ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहेत. बढेकर शैलीतील घर म्हणजे स्वप्नांना आकार देणारं घर असं म्हंटले जाते. घर घ्यायचे तेही अशा ठिकाणी जिथे नाते विश्वासाचे जपले जाते, म्हणजेच बढेकर ग्रुप शिवाय पर्याय नाही. त्यामुळे घर घेण्याचा विचार करत असाल तर बढेकर ग्रुपच्या गृह प्रकल्पांना जरूर भेट द्या.
पहा व्हिडिओ


