पालखी मार्ग भागवत धर्माची पताका उंचावेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पंढरपूरकडे जाणारा पालखी मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी pm Narendra Modi यांनी पालखी मार्गाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून या कार्यक्रमात सहभाग घेतला. भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्र सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
मोदींनी राम कृष्ण हरी म्हणत या कार्यक्रमाची सुरुवात केली. संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा महाराज यांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत असताना मला आनंद होत आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या दिंडीत सर्वजण समान असतात. तिथे जातपात, भेदभाव नसतो. सर्व वारकरी गुरु भाऊ असतात. त्यांचं विठ्ठल हे एकच गोत्र असतं. माझं पहिलं नात गुजरातच्या द्वारकाशी आहे. तर दुसरा नात कशीशी आहे. मी काशीचा रहिवासी आहे, आणि आपल्यासाठी पंढरपूर ही दुसरी काशी आहे. या भूमीने अनेक संत दिले. संत निर्माण केले. या संतांनी भारताला नवचैतन्य, ऊर्जा दिली.










