राजकीय

मोठी बातमी! भाजपकडून मनसेलाही युतीमध्ये येण्याची ऑफर?

मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून मनसेलाही युतीसाठी ऑफर देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये स्वतः पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना या गोष्टीचा खुलासा केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून आपल्याला युतीसंदर्भात ऑफर आहे. मात्र आपण अजून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकलेलो नाहीत. आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. अजित पवार देखील महायुतीमध्ये आलेले आहेत, त्यांचं काय करणार? त्यामुळे अंतिम निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्श करताना म्हटल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून देखील खोचक टोला लगावला आहे. हे एकमेकांना मिळालेले आहेत. मी आधीच तुम्हाला बोललो होतो त्यांची एक टीम गेली आणखी एक टीम जाईल. आपल्या राज्याची प्रतारणा होणार नाही, याची काळजी आमच्या पक्षाकडून घेतली जाईल अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी या भेटीवर दिली आहे.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये