उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत : निलेश राणे

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावं हेच सुचत नाहीये. आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं? हे मला वेगळं सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं, हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्यांच्याविरोधात काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजे.

“काल संतोष बांगर यांच्यावर गाडीवर अमरावतीत हल्ला झाला. यामुळे ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत, असं दिसतंय. त्यांना फटकेच द्यायला पाहिजे. त्यांना त्याच भाषेत बोललं पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावं”, असा धमकीवजा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.






