महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत..

पुणे : राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. Chandrakant Patil welcomed this decision of Maharashtra Government.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ५ कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

IMG 20210428 WA0187

कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र आणि राज्य सरकारला अशाच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

कोरोनाच्या या लढाईत लसीला शेवटचा उपाय न समजता मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करा. असे आवाहन पाटील यांनी आपल्या ट्विटर पोस्ट द्वारे केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close