पुणे शहर
भुसारी कॉलनीत रक्तदान शिबिर संपन्न

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसारी कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच आता १८ वर्षे वयाच्या पुढील सगळ्यांना लस देणे चालु होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर १ महिना रक्तदान करता येत नाही. अशा परिस्थितीत पुन्हा आपल्याला भीषण परिस्थितीस सामोरे जावे लागु नये म्हणून गजराज स्नेह मंडळांचे संस्थापक निलेश सैदाने अध्यक्ष समीर पाटील व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाने 28 जणांनी रक्तदान केलं.
संयोजक म्हणून रसिका कुलकर्णी आणि राजेश कुलकर्णी तसेच पुणे शहर सर चिटणीस संदीप लोणकर ,सचिन दशरथ दांगट , गणेश वरपे , सागर कडू ,कैलास मोहोळ ,सुरेंद कंदरे , सुहासिनी आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.




