पुणे शहर

सलग २९ व्या वर्षी शिरिष तुपे स्मरणार्थ रक्तदान याग; राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार

माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांच्या नावाने समाज भूषण पुरस्काराचे वितरण

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित सलग २९ व्या वर्षी शिरिष तुपे स्मरणार्थ भव्य रक्तदान याग आणि आम्ही अनेक वर्ष करीत असलेल्या सामाजिक कार्यात अनेकांनी  दिलेल्या योगदाना बद्दल पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दि १७ एप्रिल रोजी आयोजित सलग २९ व्या वर्षी होणाऱ्या शिरीष तुपे यांच्या स्मरणार्थ  रक्तदान यागाचे उद्घाटन आणि पुरस्काराचे वितरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती मनसे पुणे शहर सचिव आणि संयोजक राम बोरकर यांनी दिली आहे.

यावेळी दिवंगत माजी महापौर भाऊसाहेब खिलारे पाटील यांचे नावाने श्री संजय चौधरी पी एस आय ब्लड सेंटर -पुणे व संजय कुमार शिंदे अक्षय ब्लड बँक – पुणे यांना समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे व  आम्ही करत असलेल्या गेल्या २८ वर्ष आमच्या कार्यात सहभाग घेऊन आम्हांला समाजसेवे साठी सहकार्य मार्गदर्शन करणाऱ्यां पैकी एकुण १२ जणांना दिवंगत माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांचे नावे श्री संजय कुलकर्णी ,राजीव बोडस ,संजय चोरडीया सर,शाहीरराजे  हेमंत मावळे,श्री जयंत देवरे ,श्री समीर येणपुरे ,इत्यादींना  सामाजिक  कृतज्ञता पुरस्कार मा राजसाहेब ठाकरे यांचे हस्ते देण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम स्थळ वेळ  म न से कार्यालय एरंडवणे येथे १७ एप्रिल रोजी सकाळी १०-३० वाजता उद्घाटन. रक्तदान सकाळी ९ ते सायंकाळी ५ आपला अशी माहिती राम बोरकर यांनी दिली आहे.

Img 20220414 wa0001
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये