चेतन भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५३ जणांचे रक्तदान..

कर्वेनगर : Pune city सामाजिक कार्यकर्ते चेतन भालेकर Chetan Bhalekar यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या शिबिराची सुरवात करण्यात आली. या शिबिरात ५३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसंग्राम संघटनेचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड, राजाभाऊ भालेकर, केशव बालवडकर, प्रतीक नलावडे, मंगेश जगताप, रोहित चव्हाण प्रथमेश भालेकर, उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यास भेट म्हणून हेल्मेट देण्यात आले. अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे संयोजन सौ. चिनाब चेतन भालेकर यांनी केले होते.
चंद्रकांत मोकाटे म्हणाले, चेतन भालेकर कायम सामजिक कामात अग्रेसर असतात. सध्या सुरू असलेल्या कोरोना च्या संकट काळात वारंवार रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांच्या उपक्रमामुळे रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मदत मिळत आहे.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला कर्वेनगर, कोथरुड, वारजे परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून चेतन भालेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




