पुणे शहर

भव्य मूर्ती शिल्पातून साक्षात प्रभू श्रीराम पुण्यनगरीत अवतरले;राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून साकारले गेले प्रभू श्रीरामांचे मनमोहक शिल्प…

पुणे : शेकडो वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज (ता.२२) अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या निमित्ताने संपूर्ण देशभरासह पुणे शहरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलका चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी प्रभू श्रीरामांचे भव्य मूर्ती शिल्प साकारले. काथ्या आणि मातीच्या मदतीने उभारण्यात आलेले हे शिल्प पाहण्यासाठी पुणेकर रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती. 

यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले “आजच्या सोहळ्यासाठी प्रत्येकाला अयोध्येला जायला मिळाले नाही, परंतु कलाकाराने साकारलेल्या शिल्पाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचे दर्शन पुणेकरांना घडवण्यासाठी आज हे शिल्प साकारण्यात आले. परमेश्वर सगळीकडे असतो फक्त आपला भाव जागृत असायला हवा, तो या शिल्पामधून प्रकट करण्याचा प्रयत्न शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या माध्यमातून करण्यात आला. पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांची अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असल्याचा आनंद हा कोणत्याही शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा आहे.”

यावेळी भाजप सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे, विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन दादा मानकर,  कायदे तज्ञ उल्हास बापट, पोलीस अधिकारी कल्याणी पाटोळे, जितेंद्र भुरुक, राष्ट्र काँग्रेस महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे,  सांस्कृतिक विभाग अध्यक्ष विजय राम कदम, महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, महिला कार्याध्यक्ष सुनीता मोरे, शालिनी जगताप, युवक कार्याध्यक्ष आनंद सागरे, मिलिंद वालवडकर, उषा नेटके, गिरीश मेंगे, रामदास गाडे, गोरखनाथ भिकुले, मुनीर सय्यद, दुष्यंत जाधव, राहुल पायगुडे, बाबू भाई शेख, शैलेश मानकर, शंकर तेलंगे, योगेश वराडे, विशाल आगरवाल, रौफ कुरेशी, विक्रम आगरवाल, शाम शेळके, नवनाथ खिलारे, कांता खिलारे, अशोक जाधव, राज पाटील, विलास मेंगे, ऐश्वर्या मारणे, नयन गायकवाड, लावण्या शिंदे, राधिका वाईकर, सत्यम पासलकर, अनिकेत म्होकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यासह ३० कारागिरांनी प्रभू श्रीरामांचे हे शिल्प सकाळी १० वाजता तयार करण्यास सुरुवात करत सायंकाळी ५ वाजता पूर्ण केले. यासाठी जवळपास ५ हजार किलो शाडू मातीचा वापर करण्यात आला. या मूर्ती शिल्पाच्या माध्यमातून साक्षात प्रभू श्रीराम अवतरल्याचा अनुभूती यावेळी अनुभवायला मिळाली.

Img 20240121 wa00112357920439439015160
Img 20240121 wa00382598004317740425806
Img 20240122 wa00087153526944112457621
Img 20240121 wa00172482721898892502285
Img 20240121 wa00095487398556080398780
Img 20240121 wa00065252206207234881050
Img 20240120 wa00572661306229998441106
Fb img 17058117418324121437191700473490
Img 20240120 1411245335154334332732265
Fb img 17058116689734456722729440444596
Img 20240120 wa00096813043095854158068

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये