महाराष्ट्र

शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात; दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या

शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर हा अपघात घडला आहे.

शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात घडला आहे. भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या समोर गतीरोधक आल्याने वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली. मात्र मागील येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरील वाहनास धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Img 20240404 wa00206766960702058843704
Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये