पुणे शहर

श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर महिलेच्या पिशवीतून रोकड लंपास

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात भाविक महिलेच्या पिशवीतून रोकड लांबविण्यात आल्याची घटना घडली.याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

तक्रारदार महिला मूळच्या मुंबईतील मालाड येथील रहिवासी आहेत. त्या पुण्यात आल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातून त्या दर्शन घेऊन बाहेर आल्या. शिवाजी रस्त्यावर गर्दी होती. चोरट्याने त्यांच्या पिशवीतून सात हजारांची रोकड आणि कागदपत्रे लांबविली. हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये