केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पोलिस सुशांत रणवरे यांचा ‘पुणे शहर जीवन रक्षा पुरस्कार 2025’ देऊन सन्मान..

रस्त्यात अटॅक आलेल्या दोन व्यक्तींचा सीपीआर देऊन वेळेत रुग्णालयात पोहचवत वाचवला प्राण..
केंद्रीय नागरी व हवाई उड्डाण व सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिस दलातील कर्मचारी सुशांत रणवरे यांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला. दिनांक 9/11/2025 औंध बाणेर लिंक रोड येथे आणि दिनांक 24/11/2025 येरवडा गोल्फ क्लब चौक बस स्टॉप येथे हृदयविकाराच्या झटका आलेल्या 2 नागरिकांचा प्राण वाचवुन पोलीस शिपाई सुशांत काशिनाथ रणवरे यांनी आपली कार्य तत्परता दाखवून दिली होती. यांच्या याच कार्याचा गौरव आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला.

यावेळी सुशांत रनवरे यांना “पुणे शहर जीवन रक्षा पुरस्कार 2025 पारितोषिक ” देऊन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजपचे आमदार माननीय सुनील कांबळे, पोलीस विभागाचे परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते.
पहिल्या घटनेत पोलिस कर्मचारी सुशांत काशिनाथ रणवरे यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे बाणेर येथील व्हिजडम सोसायटीतील रहिवासी सुरेश अडप्पा (वय ५३) यांचे प्राण वाचले होते. औंध बाणेर लिंक रस्त्यावरील आलोमा काउंटी या सोसायटीजवळून अडप्पा हे कार चालवत असताना, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी हेलकावे खात असल्याचे रणवरे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून चारचाकीची काच फोडून अडप्पा यांना बाहेर काढले. आणि सीपीआर उपचार केले. त्यानंतर स्वतःच्या वाहनातून त्यांना ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने अडप्पा यांचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर अडप्पा यांच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी रणवरे, तसेच पुणे पोलिस दलाचे कौतुक केले होते.
दुसऱ्या घटनेत साप्ताहिक सुट्टी असूनही येरवडा गोल्फ क्लब चौक नागपूर चाळ कडे जाणारा बस स्टॉप येथे एका व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे शिपाई 9980 सुशांत काशिनाथ रणवरे यांना दिसले, रणवरे यांनी त्यांची गाडी थांबून सदर व्यक्तीला सीपीआर देऊन त्या व्यक्तीला तेथील स्थानिक व्यक्तीच्या चार चाकी स्कॉर्पिओ गाडीतून त्यांना गुंजन चौक येथील शहा हॉस्पिटल येथे तात्काळ प्रथम उपचार करता ऍडमिट केले. त्या व्यक्तीचा मोबाईल वरून त्यांच्या पत्नी ला फोन द्वारे संपर्क साधून बोलावून घेतले त्या व्यक्तीचा मोबाईल आणि पाकीट त्यांचे मित्र कदम आणि त्यांची पत्नी यांच्या ताब्यात देऊन त्यांनी सदर पेशंटला तात्काळ डी वाय पाटील हॉस्पिटल येथे जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट केले.



पुणे पोलिस दलातील शिपाई सुशांत रणवरे यांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे दोन पुणेकरांना वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले आहेत. त्यामुळे रणवरे यांच्या कार्याचे कौतुक पुणेकरांकडून केले जात आहे. प्राण वाचवलेल्या दोघांच्या कुटुंबीयांनी सुशांत रणवरे यांचे आभार मानले आहेत. आज त्यांच्या या कार्य तत्परतेचे कौतुक पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील केले आहे.



