पुणे शहर

पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश – PMC कनिष्ठ अभियंता परीक्षा स्थगित..

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (GJE) भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून 1 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवारांची गैरसोय, आगामी मतदान प्रक्रिया तसेच शासकीय कर्तव्यांमध्ये अडकलेले परीक्षार्थी यांचा सर्वांगीण विचार करून PMC प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.

ही कार्यवाही पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा थेट परिणाम आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी PMC आयुक्त मा. रामकिशोर नवल साहेब यांना दिलेल्या सविस्तर निवेदनात परीक्षेच्या तारखेमुळे उमेदवारांना भेडसावणाऱ्या वस्तुनिष्ठ अडचणी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या होत्या.

PMC ची GJE परीक्षा 1 डिसेंबर रोजी होणार होती, तर राज्यातील मतदान 2 डिसेंबरला निश्चित आहे. अनेक परीक्षार्थींना मतदानासाठी 250–300 किमी किंवा त्याहून अधिक अंतर प्रवास करावा लागणार होता. यामुळे—
▪️ परीक्षेनंतर त्वरित मूळ गावी पोहोचणे
▪️ दुसऱ्या दिवशी मतदानासाठी वेळेत उपस्थित राहणे
हे प्रत्यक्षात अशक्य बनत होते.

काही उमेदवारांना Election Duty असल्यामुळे परीक्षा व शासकीय कर्तव्ये एकाच दिवशी सांभाळणे अत्यंत कठीण स्थिती निर्माण झाली होती.

भाजप युवा मोर्चा  पुणे शहर अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिलेले प्रमुख मुद्दे—
• उमेदवारांच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण
• Election Duty असलेल्या उमेदवारांना आवश्यक तयारीची संधी
• काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी
• परीक्षा केवळ TCS iON सारख्या अत्याधुनिक केंद्रांवरच घेण्याची मागणी
• परीक्षा पूर्णपणे पारदर्शक, न्याय्य व सुरक्षित राहावी

Img 20251125 wa00126624322614302660332

वरील मुद्दे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

PMC च्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत आदेश काढत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली असून नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

हा उमेदवारांसाठी मोठा दिलासा असून
या निर्णयामुळे—
▪️ मतदानासाठी वेळेत पोहोचण्याची अडचण दूर झाली
▪️ Election Duty असलेले उमेदवार निर्धास्त झाले
▪️ परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम पद्धतीने आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला


दुष्यंत मोहोळ म्हणाले, “उमेदवारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि परीक्षा पारदर्शक राहावी, ही आमची स्पष्ट भूमिका होती. प्रशासनाने या मुद्द्यांची योग्य दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो. आगामी परीक्षेसाठी TCS iON सारख्या उच्च-स्तरीय केंद्रांनाच प्राधान्य द्यावे, ही युवा मोर्चाची ठाम भूमिका राहील,”

या निर्णयानंतर उमेदवारांकडून PMC प्रशासनासह भारतीय जनता युवा मोर्चाचे मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये