आरोग्य

सवयी बदलल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढली आहे ; ती कायम ठेवा अन्यथा..

कोरोना संसंर्ग विश्व महामारीने गेले दोन वर्ष भारतासह संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आज भारतासह जगभरात ह्या आजाराची दहशत कमी झाली असली तरी कमी जास्त प्रमाणात ह्याचे रुग्ण आढळून येत आहेत. लाॅकडाऊन, मास्क चा वापर, सोशल डिस्टंसिंग, सतत हात धुणे, सर्वात महत्वाचे म्हणजे झालेले लसीकरण यामुळे साथ जरा मंदावली आहे हे नक्कीच खरे. भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली असल्याने रुग्णांच्या गर्दीने भरलेले दवाखाने मात्र आता रिकामे दिसू लागले आहेत.

या कोरोनाच्या साथीमुळे सर्व सामान्य जनतेला आरोग्यविषयक काळजी घेणे किती आवश्यक आहे ते समजले. साधारणपणे कोरोनाच्या साथीमध्ये प्रत्येकाने आपला जवळचा नातेवाईक, नातेवाईक, मित्र, गमावला आहे. बरेच डाॅक्टर आहेत त्यांच्या स्वतःच्या घरातील सदस्यांचा यात बळी गेला आहे.

कोरोना संसंर्ग काळात लोकांना आरोग्यविषयक जनजागृती झाली आहे. सकस आहार, व्यायाम, घरातील रूचकर अन्नच खाणे, बहेरील पदार्थ कमी प्रमाणात खाणे, वेळेवर जेवण करणे, अशा अनेक चांगल्या सवयी नागरिकांना लागल्या आहेत. Vit.C and Vit D ची औषधे, फळे,
Immunity वाढीची घेतलेली औषधे.. ह्या सर्व एकत्रित गोष्टींमुळेच आज बऱ्याच जणांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे, त्यामुळे छोट्या छोट्या कारणांसाठी दवाखान्यात जाणे कमी झाले आहे हे डाॅक्टर म्हणून मान्य केलेच पाहीजे..

छोट्या गावात खेड्यात लोक आता आरोग्यविषयक जागृत झाले आहेत. बाहेर असताना बंद बाटलीतील पाणी पिणे, दुषित पाणी न पिणे, घरोघरी डास प्रतिबंधक उपाय आहेत. वैयक्तिक स्वच्छता त्यामुळे आजार कमी झाले आहेत. आता सेलिब्रिटी आजार राहिले आहेत ते म्हणजे हृदय रोग, उच्चरक्तदाब, मधूमेह, कॅन्सर.

मानसिक ताण तणावामुळे मानसिक आजार तयार झाले आहेत. आजार कमी झाले नाहीत फक्त प्रकार बदलले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती काही कालावधी पुरती नक्कीच वाढली आहे. त्यामुळे दवाखान्यातील रुग्ण संख्या नक्कीच ओसरली आहे हे मान्य परंतू नियम पाळून काम करेल तो माणूस कसा. एकदा परत लाॅकडाऊन ची सर्व बंधने कमी झाली की परत गर्दी, बाहेरचे खाणे,.वेळीअवेळी खाणे, व्यसनाधीनता, लग्न कार्य, गर्दीचे कार्यक्रम, मास्क न लावता फिरणे, हात न धुता खाणे, परत रोगप्रतिकारक शक्ती मंदावणार आणि परत दवाखान्यातील रुग्ण संख्या वाढणार..

आम्ही डाॅक्टर तर रूग्णांसाठीच आहोत पण आपण सर्वांनी सकस आहार, योग्य व्यायाम, कमी प्रमाणातील व्यसनाधीनता, ठेवली तर आपले आरोग्य नक्कीच छान निरोगी राहील ह्यात शंका नाही. आज दवाखान्यात जरी स्लॅक( कमी प्रमाणातील रुग्ण संख्या) असेल तरी सर्वांनी आपली आरोग्यविषयक काळजी घेतली तर आमचा डाॅक्टर मंडळीचा स्लॅक राहीलही पण समाज निरोगी होईल ह्यात मात्र शंका नाही.

डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ पुणे

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00038702747946855041624

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये