पुणे शहर

कोथरुडमधील मेट्रो स्टेशनचे ‘युगपुरुष छत्रपती श्री. शिवाजी महाराज’ असे नामकरण करा : दीपक मानकर

पुणे: pune city, Kothrud महामेट्रोच्या प्रकल्पातील फेज २ वनाज ते रामवाडी या मार्गावरील कोथरुड या ठिकाणी तयार होत असलेल्या मेट्रो स्टेशनचे ‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन’ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दीपक मानकर यांनी केली आहे.

दीपक मानकर यांनी या संदर्भातील निवेदन महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, दत्ता सागरे उपस्थित होते.

मानकर यांनी म्हंटले आहे की, छत्रपती श्री. शिवाजी महाराज हे साऱ्या महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ हा त्यांनी पुणे जिल्ह्यातच व्यतीत केला आहे. त्यांच्या नाव लौकिकास साजेसे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक त्यांची ही जन्मभूमी असलेल्या पुण्यामध्ये साकार व्हावे, अशी आम्हा शिवप्रेमींची इच्छा आहे. त्याच धर्तीवर मी गेली अनेक वर्षापासून कोथरुड परिसरात एक भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी याकरिता प्रयत्न करीत आहे.

तरी महामेट्रोच्या प्रकल्पातील फेज २ वनाज ते रामवाडी या मार्गावरील कोथरुड या ठिकाणी तयार होत असलेल्या मेट्रो स्टेशनला ‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन’ असे नामकरण करण्यात यावे,अशी मागणी त्यांनी महामेट्रोकडे केली आहे.

Img 20211014 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये