पुणे शहर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चांदणी चौकात पाहणी; युद्धपातळीवर काम करून उपाययोजना करणार असल्याची ग्वाही

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांदणी चौक परिसराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी चांदणी चौकात (Chandani Chowk) युद्धपातळीवर काम करून उपाययोजना केली जाईल. पूल तोडण्याचे काम होईपर्यंत 100 ट्रॅफिक वॉर्डन याठिकाणी तैनात असतील. जड वाहतुकीचे नियोजन करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Fb img 1661689206867

ते म्हणाले, की उद्यापासून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ याठिकाणी लागणार आहे. सर्व्हिस रोड (Service road) एकमेकांना जोडला जाईल. अधिक लेन सुरू होतील. हद्द नंतर पाहा. आधी नागरिकांना दिलासा द्या, अशा सूचना सर्व विभागांना दिल्याचे शिंदे म्हणाले. मात्र मुख्यमंत्र्यांसमोरच एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा निघेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Fb img 1661689322312

चौकात काम सुरू असल्याने मुंबईकडून येणाऱ्या एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. ते चांदणी चौक परिसरात आले. त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की परवाच्या दिवशी मी इथून साताऱ्याकडे जात होतो, त्यावेळी येथील प्रवासी मला भेटले. त्यांनी येथील वाहतुकीची जी काही समस्या होती, ती माझ्या कानावर घातली. त्याचवेळी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, एनएचएआयचे अधिकारी या सर्व संबंधित विभागाशी फोनवरून संपर्क केला. काल साडेअकरा वाजता ही संपूर्ण टीम याठिकाणी येवून गेली. त्यांनी पाहणी केली, असे ते म्हणाले.

Fb img 1661689327532

चांदणी चौकातील वाहतूक

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये