पुणे शहर

पुण्यात स्कूलबस चालकाचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार


पुणे : अल्पवयीन विद्यार्थिंनीवर स्कूलबस चालकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.


पीडित विद्यार्थिनी दहावीत शिकत असून स्कूल बसमधून ये-जा करत होती. यादरम्यान पीडित विद्यार्थिनी आणि आरोपीची ओळख झाली. पीडित तरुणीला आरोपीने रिलेशनशिपमध्ये राहणार का, असे विचारले व तिला बळजबरीने पडक्या इमारतीत ओढत नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्थानकात बलात्कारासह पोक्सो ॲक्ट अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याआधीही शहरात अनेक अशा घटना घडल्या असून पुण्यातील स्कूल बसमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मात्र आरटीओ आणि पोलिसांचे स्कूल बसकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये