पुणे शहर

वारजेत मंत्री चंद्रकांत पाटील व समर्थ युवा फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद..

वारजे : वारजे येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात १३५०० रु च्या विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराला प्रतिसाद देत आपल्या तपासण्या करून घेतल्या.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

विविध रक्त तपासण्या, नेत्र तपासणी, महिलांसाठी मेमोग्राफी तपासणी, दंत तपासणी अशा अनेक मोफत तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या. वारजे परिसरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, महीला भगिनी सर्वांनीच या शिबिरास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत शिबिरातील उपचारांचा लाभ घेतला.

या प्रसंगी श्रीकृष्ण बराटे, हभप नारायण महाराज गोरे, डॅा. प्रशांत सुराणा,रामभाऊतात्या शिंदे मान्यवर उपस्थित होते.
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य समृद्ध राहावे त्याचे निदान व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शिबिराचे आयोजक माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी सांगितले.

Img 20250530 wa00932642486684275500704
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये