पुणे शहर

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडून ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत मोहीम

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा” उपक्रम पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला. महापालिका सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे-गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळसगाव, भीमनगर, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, भारतनगर, संत सयाजीनाथ माळी विसर्जन घाट तसेच गोल्फ क्लब चौक उड्डाणपूलाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Img 20231001 wa0006
Img 20231001 wa0008

यामध्ये येरवडा परिसरातील माजी सभासद, विविध सामाजिक संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, खासगी कंपन्यांचे कर्मचारी, येरवडा क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागातील अधिकारी व सेवकवर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने आवर्जून सहभागी झाले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून स्वच्छता मोहीम राबवित असताना आपला परिसर ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन या निमित्ताने महापालिका सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांनी यावेळी केले. या स्वच्छता मोहिमेतील सहभागी सर्व उपस्थितांना यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच स्वच्छता सप्ताह दरम्यान स्वच्छता विषयक जनजागृती व प्रबोधनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Img 20230812 wa0001281292979418231884101793
Img 20221228 wa000128229460950061152000874

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये