पुणे शहर

पुण्यात ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्यातील (Pune Crime) सुप्रसिद्ध ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर (Pune Crime News) दोन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या ससून रुग्णालयासमोर हे अमली पदार्थ जप्त केल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. 

अमली पदार्थ विक्रीचं हे हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी 2 तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी त्याला याआधीच पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. त्यानंतर पटेलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा तो हे रॅकेट कसे चालवतो याचा तपास पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

पुणे पोलिसांच्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक राज्यातील विविध ठिकाणांहून येत असतात. त्यामुळे रुग्णालयात कायमच वर्दळ असते. अशा परिस्थितीत रुग्णालयाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. मात्र, याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. आता तर दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर कोट्यावधींचे ड्रग्ज सापडले म्हटल्यानंतर हे प्रकरण गंभीर आहे. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20230812 wa0001281292979418231884101793
Img 20221228 wa000128229460950061152000874

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये