पुणे शहर

कोथरुडमध्ये श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीराचा समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न…

मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यास शिबिराची मदत झाली : पृथ्वीराज सुतार

पुणे : पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) व बाल विकास केंद्र नॉर्थ डहाणूकर कॉलनी यांच्या संयुक्त सहकार्याने कोथरूड परिसरातील ३ ते १५ वर्षांच्या वयोगटातील मुला मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीराचा समारोप उत्साहात पार पडला.

दिनांक २० मे ते ३१ या कालावधीमध्ये हे शिबिर पार पडले.
या कालावधीमध्ये मुला मुलींसाठी नृत्य प्रशिक्षण, हस्तकला, मातीकाम, लाठी-काठी चालविणे, चित्रकला, संगीत, गायन, पपेट शो, ॲक्टिंग  यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच इतिहासातील छत्रपती श्री शिवाजी महारांजाचे मावळे म्हणजेच स्वराज्य योध्दे मुलांना कळण्यासाठी मावळा हा खेळ मुलांकडून खेळून घेण्यात आला.

दररोज सायं ५ ते ७ या वेळेत या शिबीराचे आयोजन नॉर्थ डहाणूकर कॉलनीच्या मैदानावर करण्यात आले होते. रोज मुलांना पोहे, उपीट, शिरा, वडापाव, कच्छी दाबेली, भेळ, उत्तपा असा खाऊ देण्यात आला, समारोपाच्या दिवशी सर्व मुलांना व पालकांना सॅन्डवीच व आईस्क्रिम देण्यात आले. यावेळी शिबिराच्या काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील ६० विद्यार्थ्यांना शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते बक्षिसे  देण्यात आली.

Img 20220601 wa0194

यावेळी बोलताना पृथ्वीराज सुतार म्हणाले, लहान मुलांची मानसिक व शारिरिक वाढ व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिराचे १७ वे वर्ष असून, दरवर्षी साधारण तीनशे ते साडेतीनशे मुले यामध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीतून आता आपण सगळेजण बाहेर पडत आहोत. गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनामुळे लहान मुलांना मोकळ्या मैदानावर खेळता येत नव्हते. परंतु या शिबीरामुळे मुलांना अनेक मित्र मिळाले, त्यांच्या आवडीचे खेळ खेळता आले. त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला, मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास या शिबिराची मदत झाली.

Img 20220521 wa0000

पुढच्या वर्षीपासुन कोथरूडच्या विविध भागात या शिबिराचे आयोजन करावे तसेच पालकांसाठी सुध्दा अशा संस्कार शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी सर्व यावेळी पालकांनी केली. या कार्यक्रमास बालविकास केंद्राच्या प्रमुख अपर्णा वेर्णेकर, स्मिता वाळिंबे, बुचकेसर, दिपाली देशमुख, अर्चना बडबडे, सीमा भोज, प्राजक्ता बाभुर्डे, अनघा कुंटे, रायकर ताई ऐश्वर्या डेरे,छाया हुलाळकर, फेडरेशनचे संस्थापिका डॉ. दिपाली फाटक,राहुल यादव, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनंदा डेरे यांनी केले तर आभार राजेश्वरी यादव यांनी मानले.  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश क्षीरसागर, चंद्रकांत बोहुडे, नचिकेत घुमटकर, विशाल उभे, भरत कोळपे, जितेंद्र खुंटे, योगेश चौधरी, अविनाश इंगळे, चेतन डेरे, विष्णू फाले यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये