पुणे शहर

पुण्यात अपघाताचा बनाव रचून मोटारचालकाला लुटले

पुणे : अपघात झाल्याचा बनाव करून चोरट्यांनी मोटारचालकाला लुटल्याची घटना येरवड्यातील डेक्कन काॅलेज रस्त्यावर घडली. याबाबत मोटारचालक अमित भोसले (वय ३१, रा. मंगलमूर्ती पार्क, कोथरुड) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

मोटारचालक अमित येरवड्यातील डेक्कन काॅलेज रस्त्याने निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी माेटार अडविली. मोटारीने दुचाकीला धडक दिल्याची बतावणी करून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. अमित यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून दुचाकीवरून चोरटे पसार झाले. भोसले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सातपुते तपास करत आहेत.

Img 20230126 wa00008877313132605679443

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये