सर्वांगीण वाचन हा प्रभावी वक्तृत्वाचा पाया- डाॅ.केशव तुपे

वारजे : सखोल वाचन आणि व्यासंग याद्वारेच वक्तृत्व स्पर्धाचे सिंहासन जिंकता येईल.विद्यार्थांनी ग्रंथालयात जाऊन ग्रंथांचे सखोल वाचन करणे आवश्यक आहे. वर्तमानात समाजमाध्यमात तरुणाई गुंतलेली असून युवापिढीवर राष्ट्र संवर्धनाची जबाबदारी आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे असे मत महाराष्ट्र शासन पुणे विभाग, सहसंचालक, डाॅ. केशव तुपे यांनी व्यक्त केले.
संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक दिलीप बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डाॅ. केशव तुपे यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी दिलीप बराटे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात, प्रा.आशुतोष कसबेकर, सुजित काळंगे उपस्थित होते.

दिलीप बराटे म्हणाले, अध्यापकांनी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थांच्या विचारांच्या कक्षा रूंदावणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक भूक भागण्यासाठी देखील प्रयत्न करायला हवा .साहित्य, कला, शिल्प, संगीत, खेळ या क्षेत्रात विद्यार्थांनी भरीव योगदान देणे विकसित भारतासाठी आवश्यक आहे.



प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करून स्पर्धकांचे स्वागत केले. राज्यभरातून ३२ स्पर्धकांनी स्पर्धेत विचार मांडले. प्रास्ताविक डाॅ.प्राजंली विद्यासागर यांनी केले तर आभार डाॅ.दिपक शिंदे यांनी मानले. परीक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी डाॅ.पाडुरंग कंद व प्रा.सुशील धसकटे यांनी पार पाडली



स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण हरीश नवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अविनाश जाधव, डाॅ.देवेंद्र भावे,आशुतोष निकम, रोहन कवडे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल-
प्रथम– इरफान शेख,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,रोख ५००० करंडक व प्रमाणपत्र
द्वितीय- अक्षय चौरे,आबासाहेब गरवारे महाविद्यालय, रोख ३००० हजार करंडक व प्रमाणपत्र
तृतीय- चैतन्य बनकर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,रोख २००० हजार करंडक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ– १) तेजस पाटील,पुणे रोख १००० रूपये व प्रमाणपत्र
२) तन्वी कांबळे-पुणे रोख १००० रूपये व प्रमाणपत्र
३) क्षितिजा मेटकरी,पुणे रोख ५०० व प्रमाणपत्र
४) अभय आळशी-मुंबई, रोख ५०० व प्रमाणपत्र






