पुणे शहर

कर्वेनगरवासियांनी योग शिबिरातून घेतले निरोगी आरोग्याचे धडे..

कोथरूड : आज कर्वेनगरवासियांची सकाळची सुरुवात झाली ती आरोग्यदायी आशा योग शिबिरातून. ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धीविनायक योग प्रसार मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिराला कर्वेनगर मधील योग साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भारताने अवघ्या विश्वाला दिलेली आरोग्यदायी देणगी म्हणजे योगा! या योगाचा प्रसार व्हावा आणि सर्वांना आरोग्यदायी आयुष्य लाभावे, यासाठी दि. २१ जून रोजी जागतिक योगा दिन साजरा करण्यात येतो. याच योगा दिनाचे औचित्य साधून कोथरूड कर्वेनगर मधील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल या ठिकाणी भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धीविनायक योग प्रसार मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात योगाचार्य डॉ. विनायक मुसळे यांनी मार्गदर्शन करत अनेक योगासनांची माहिती दिली. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात अनेक योग साधकांनी उत्कृष्ट योग साधनेचे दर्शन घडवत उपस्थितांना थक्क केले.

Img 20240404 wa00162092919036315770776

यावेळी योग शिबिराचे संयोजक,कोथरूड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष स्वप्नील दुधाने म्हणाले,  उत्तम आरोग्य हाच आपला खरा दागिना असून तो जपणे, हे आपले कर्तव्य आहे. यासाठी रोजच्या धकाधकीच्या जीवनातील निव्वळ एक तास आपल्या आरोग्यासाठी काढणे आवश्यक आहे.  उत्तम आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी योगा हा सर्वोत्तम मार्ग आहे, त्यामुळे योग साधनेचा आवलंब सर्वांनी आपल्या जीवनात करणे आवश्यक आहे.

Img 20240404 wa00132425955639205292116
Img 20240404 wa00127754739105663743070

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये