राजकीय

मुंबईत काँग्रेस लढणार स्वबळावर

मुंबई : महानगरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. महापौर भाजपचाच अशी घोषणा देत भारतीय जनता पक्ष २०२२ साली होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षानेही स्वबळावर लढणार असे गुरुवारी जाहीर करून टाकले आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही घोषणा केली आहे. मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढेल. असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते, खा. संजय राऊत यांनी केला होता. परंतु आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचे जाहीर करून खळबळ उडविली आहे. शिवसेनेवर दबाव आणण्याचा कॉंग्रेसचा हा डाव आहे का ? किंवा मुस्लीम आणि मागासवर्गीय पारंपारिक मतदार दूर जावू नयेत याकरिता कॉंग्रेस सेनेपासून अंतर ठेवत आहे का ?हे पहावे लागेल. मुंबई प्रदेश काँग्रेसने प्रतिक्रिया दिलेली नाही.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये