कोथरुड

नगरसेवक रामचंद्र कदम यांच्याकडून अधिकाऱ्यांसह मेट्रो कामाची पाहणी

कोथरुड : पौड रोड वरील किनारा हॉटेल ते पौड फाटा पर्यंत मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने नगरसेवक रामचंद्र कदम यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसह या कामांची पाहणी केली. या कामांमुळे नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात. अशा सूचना कदम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर मधील पौड रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारच्या दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील कामाचा राडारोडा, पादचारी मार्गावरील खड्डे, मुख्य रस्त्याकडेच्या खराब झालेल्या साईडपट्टीची व  विद्युत वायरींग यांची दुरुस्ती व  धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवणे यासारखी कामे लवकरात लवकर करण्यासंदर्भात कदम यांच्याकडून मेट्रो कोथरूड विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र देण्यात आले आहे.

Img 20201024 wa0166 1

आज झालेल्या पाहणीत लवकरात लवकर नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात तसेच काम करताना कोणाला त्रास होणार नाही यासाठी काळजी घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.  यावेळी मेट्रोचे अधिकारी मुजमले, मल्लिकार्जुन, धनंजय के, तसेच  स्थानिक नागरिक सुप्रिया आदवनकर, समीर लोखंडे, रेणुसे, कुलकर्णी, चिंचोलीकर, विलास कदम, बाळासाहेब सूर्यवंशी, ढाके, फाळकर काका, अनिल ढमाले, चौधरी साहेब, विठ्ठल भरेकर, उपस्थित होते.

Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये