महाराष्ट्र

महाराष्ट्रात उद्या रात्री ८ पासून पुढचे पंधरा दिवस पूर्ण संचारबंदी ; अनावश्यक बाहेर पडता येणार नाही : उध्दव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना पुढील पंधरा दिवसांसाठी कलम १४४ अंतर्गत राज्यात पूर्ण संचार बंदी जाहीर केली आहे. दि.१४ एप्रिल रात्री ८ पासून ही संचार बंदी सुरू होणार असून ३० एप्रिल पर्यंत ती असणार आहे. A complete curfew in Maharashtra for the next fortnight from 8 pm tomorrow

कोरोनाचा आळा घालण्यासाठी लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांबरोबर व  टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी आज संचार बंदीचा निर्णय घेतला.

ठाकरे म्हणाले, वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. आज एका दिवसात राज्यात ६०२१२ ऐवढे कोरोना रुग्ण सापडले आहेत. परिस्थिती बिकट आहे. आजची वेळ निघून गेली तर आपल्या मदतीला कोण येणार नाही. म्हणून कडक निर्बंध करणे गरजेचे आहे. राज्यात ऑक्सीजन ची कमतरता आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून हवाई मार्गाने लष्कराच्या मदतीने ऑक्सीजन आणण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केंद्राकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, राज्यात लसीकरणाचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. लस घेतल्यानंतर प्रतिकार शक्ती यायला काही दिवस जावे लागतात त्यामुळे लसीकरण करत असताना देखील पुढील काही दिवस काळजी घ्यावीच लागणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था तोकडी पडताना दिसत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मदतीला यावे असे आवाहन करतो. तसेच आता वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. ही साखळी तुटली नाही तर ती आपल्याला गुरफुटून टाकेल. जीव वाचवणे हेच आता महत्वाचे आहे त्यामुळे संचार बंदीचा निर्णय घेत असल्याचे ठाकरे म्हणाले. परिस्थिती समजावून घेऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

IMG 20210412 WA0106

हे सुरू राहणार

किराणा मेडिकल सुरू राहणार. अत्यावश्यक सेवेशी निगडीत उद्योग सुरू राहणार.
कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणार. खत दुकाने, शितगृह, शेतीची कामे सुरू राहणार.
रेस्टॉरंट बार बंद राहणार.
केवळ पार्सल सेवा सुरू राहणार.
अनावश्यक बाहेर पडता येणार नाही.
प्राण्यांची दवाखाने सुरू राहणार.
पेट्रोल पंप सुरू राहणार.
शिवभोजन थाळी मोफत मिळणार. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे सुरू राहणार.

WhatsApp Image 2021 04 13 at 10.33.34

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये