पुणे शहर

पुणे महापालिकेतील अधिकारी आणि माजी नगरसेवकांना अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ मिळावा : दीपक मानकर यांची अजित पवारांकडे मागणी 

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रात विविध भागात    माजी नगरसेवक आणि अधिकारी वर्ग हे अहोरात्र जनतेची सेवा करित आहे.त्या अनुषंगाने नगरसेवक आणि अधिकारी यांच्यासह कुटुंबीयांना आरोग्याची समस्या निर्माण झाल्यावर, पुणे महापालिकेसोबत संलग्न असलेल्या शहरातील काही खासगी रूग्णालयात अंशदायी वैद्यकीय योजनेंतर्गत 1967 सालापासून नगरसेवक आणि अधिकारी वर्गाला आजवर मोफत उपचार घेणे शक्य होत होते. आता महापालिका रूग्णालया व्यक्तीरिक्त इतर खासगी रुग्णालयात अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही.अशी माहिती समोर येत आहे.

तरी पुणे महापालिकेतील अधिकारी आणि माजी नगरसेवकाना अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मानकर म्हणाले, खासगी रूग्णालया मधील उपचाराचा खर्च लक्षात घेता,तो खर्च कोणालाही परवडणारा नाही. संबधित रुग्णांनी वेळेवर उपचार न घेतल्यास तो आजार बळावू शकतो.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन,पूर्वी प्रमाणे पुणे महापालिके सोबत संलग्न असलेल्या इतर रूग्णालयात अंशदायी वैद्यकीय योजनेंतर्गत नगरसेवक आणि अधिकारी यांना उपचार घेण्यास परवानगी देण्यात यावी,असे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करित आहे.या निर्णयामुळे अधिकारी आणि नगरसेवक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिलासा देणारा निर्णय ठरेल असे त्यांनी सांगितले.

Img 20240202 wa00034606059587729487622
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये