कोथरुड

कोथरुडमध्ये फिरत्या विसर्जन हौदाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..

कोथरुड : Kothrud कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या विसर्जन हौदाचे भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील chandrakant patil यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .

महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, पुणे शहर भाजपा चिटणीस निलेश कोंढाळकर यांच्या पुढाकारातून नागरिकांसाठी या फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी  माजी आमदार चंद्रकांत मोकटे, कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनीत जोशी, स्थानिक नगरसेविका वसंती जाधव, हर्षाली माथवड, दुष्यंत मोहोळ, अमित तोरडमल  सागर कडू, वैभव मारणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसरर्जनाकरिता  होणारी गर्दी टाळण्यासाठी या फिरत्या विसर्जन हौदांची आणि मुर्ती संकलनकेंद्राची व्यवस्था करण्यात आली असल्याचे निलेश कोंढाळकर यांनी सांगितले.

Img 20210913 wa0011 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये