पुणे शहर

नऱ्हे येथे लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी..

पुणे : नऱ्हे येथे कोव्हिड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र  नियमित सुरु करण्यात यावे व लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदार संघाचे उपाध्यक्ष रोहिदास जोरी यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन जोरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मौजे नन्हे या परिसरात एका ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रावर आठवड्यातून एकदाच लसीकरण सुरु आहे. त्यामुळे या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.  या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता या भागात लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज असल्याचे जोरी यांनी म्हंटले आहे.

IMG 20210421 WA0018 1

आता १८ वर्षापुढील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने  लसीकरण केंद्रावर ताण येणार आहे. अशा परिस्थितित जि.प शाळा, महाविद्यालय, दवाखाने, व इतर सार्वजनिक ठिकाणी रोज लसीकरण सुरु करावे.  कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र नऱ्हे येथे नियमित सुरु करावे व लसीकरण केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी जोरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close