पुणे शहर

पुणे शहरातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला ; पोलीस आयुक्तांची माहिती 

पुणे : राज्य सरकारने १ मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो किती दिवस असावा, याचा निर्णय आज होणार होता. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. त्यामूळे पुण्यात आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.Lockdown in Pune extended till May 15; Information of the Commissioner of Police

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आंतरराज्य आणि आंतर जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर ई पास अत्यावश्यक आहे. आतापर्यंत जवळपास ९ हजार जणांना डिजिटल पास देण्यात आले आहेत. जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरात सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

IMG 20210428 WA0187
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close