पुणे शहर

वारजेमधील तिरुपतीनगर, आकाशनगर येथील मुख्य चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक करण्याची मागणी…

वारजे : वारजे तिरुपतीनगर, आकाशनगर येथे डीपी रस्ते एकत्र आलेल्या मुख्य चौकात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व जेष्ठ नागरिक कट्टा व वाचनालय विकसीत करण्याची मागणी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Img 20250508 wa0001235733770892078245

या संदर्भातील निवेदन वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे  सहाय्यक महापालिका आयुक्त दिपक राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी दिले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरुड विधानसभा माजी युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, पुणे शहर सरचिटणीस विष्णू सरगर उपस्थित होते. यावेळी चौकातील रस्ता खराब झाला असल्याने त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.

Img 20250711 wa01938153452573979352517

प्रभाग क्र. ३१ मधील तिरुपतीनगर आणि आकाशनगर येथील मुख्य चौकामध्ये दोन महत्वपूर्ण डीपी रोड एकत्र येत असून चौकालगत रस्ता सोडून काही जागा शिल्लक आहे. सदर जागेत विविध संघटना, समाजसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता मोहीम, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा असे विविध उपक्रम आयोजित केले जात असतात.

स्वप्नील दुधाने म्हणाले, आम्ही केलेल्या मागणीला महापालिका सहाय्यक आयुक्त दीपक राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या चौकालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत महापालिकेच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता वाचन कट्टा विकसित केल्यास जागेचा सदुपयोग होईल, यात शंकाच नाही.

Screenshot 20250710 110010 whatsapp2954762159264963718
Img 20250704 wa00173607138186167183613
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये