कोथरुड

गौरी गणपती सजावट स्पर्धेत पवळे, भोज यांना प्रथम क्रमांक

कोथरुड : सामर्थ्य प्रबोधिनी सामाजिक संस्थेच्या वतीने कर्वेनगर परिसरात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत गौरी सजावट विभागात वैष्णवी पवळे तर घराचा गणपती सजावट विभागात वैष्णवी भोज यांना प्रथम क्रमांक मिळाला.

ही स्पर्धा २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. सदर स्पर्धेस कर्वेनगर  मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  येथील हिंगणे होम कॉलनी सभागृहामध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन करत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.  पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक राजाभाऊ बराटे, यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते कमलाकर काळे,गणेश जाधव, सागर फाटक, किशोर शेडगे संस्थेचे अध्यक्ष सुशांत भिसे उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन अखिल कोकण संघटना कोथरूड विभाग अध्यक्ष संतोष वरक यांनी केले होते.

यामध्ये गौरी विभागात रोहिणी जोरे द्वितीय, प्राजक्ता गुंड तृतीय तसेच घरचा गणपती विभागात  स्नेहा चेतन खेडेकर द्वितीय, कुशल शिरोळे तृतीय, सुरश्री सागर वैराट चतुर्थ व मनीष पायगुडे यांना पाचवा क्रमांक मिळाला. यावेळी राजाभाऊ बराटे म्हणाले, सामर्थ्य प्रबोधिनी  सामाजिक संस्थेने कोरोना महामारीच्या काळामध्ये आगळीवेगळी संकल्पना राबवत नागरिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा घेत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. संस्थेचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संस्थेचे रोहित परदेशी, अमेय हुंदळेकर यांनी केले यावेळी अमन खेडेकर, सुशील भूमकर, अजय मापारे, मंगेश साळेकर, योगिता बढे, भारती आंग्रे, संतोष चौधरी, आदी सभासद उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये