महाराष्ट्र

यंदाची आषाढीची पूजा फडणवीस करतील : जयकुमार गोरे

सातारा : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या कथित बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता साताऱ्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाची शासकीय पूजा ही सध्याचे विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री या नात्याने करतील असं भाकित व्यक्त केलंय.

गोरे म्हणाले की, “सरकार अस्थिर झालंय की झालं नाही यावर माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.” पत्रकारांनी कधी असा प्रश्न विचारला असता जयकुमार गोरे यांनी, “खूप वेळ नाही. लवकरच आपल्याला बातमी येईल आणि यंदाची आषाढीची पूजा फडणवीस करतील.” असंही म्हटलं. जयकुमार गोरे यांनी १० जुलैआधी राज्यामध्ये सत्तांपालट होईल असा सूचक इशारा दिला आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्यावतीने पांडुरंगाची पूजा करतात. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये