पुणे शहर

बावधन परिसरात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा ; दिलीप वेडे पाटील यांच्या वतीने योग शिबिराचे आयोजन..

बावधन : बावधन-कोथरूड परिसरात जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नगरसेवक दिलीप वेडेपाटील फाउंडेशन, भारतीय योग संस्थान (पंजी), ऋग्वेद योगा व राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बावधन मधील एलएमडी चौकात असणाऱ्या छत्रपती  संभाजी महाराज क्रीडांगण येथे या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेऊन उत्साहात योग दिन साजरा केला.

सदर योग शिबिरामध्ये ४ वर्षाच्या चिमुकलीपासून ८५ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक अशा एकूण ५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.

माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आयोजित केलेल्या या योग शिबिरामध्ये बावधन सिटीझन फोरम, ग्रीन क्राऊन बावधन, बावधन ज्येष्ठ नागरिक संघ, बावधन हास्य क्लब, बावधन व्यापारी संघ, राष्ट्रसेवा प्रतिष्ठान, नगरसेवक दिलीप वेडेपाटील युवा मंच, पुणे मनपा शाळा क्र.153 बी व 82 बी या सर्व सामाजिक संस्थेचे सभासद पदाधिकारी व शाळेचे विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहावयास मिळाला.

Img 20220621 wa0084
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये