महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांना पुष्पा स्टाईल इशारा…

नागपुरात बोलताना उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा स्टाईल इशारा देत समाचार घेतला. उध्दव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं मी फडतूस नाही तर काडतूस आहे.. झुकेगा नही साला… मैं
घुसेगा…अशी शेरेबाजीदेखील करत ठाकरे यांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू… अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोप सभेत ते बोलत होते.

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता रोशन शिंदे यांना
शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह तिची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करताना राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याची टीका केली होती.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

ठाकरे यांच्या या टिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजपकडून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पत्रकार परिषद घेत उध्दव ठाकरे यांना घरकोंबडा म्हणत बाहेर पडणे मुश्किल होईल असा एक प्रकारे इशाराच दिला आहे. भाजपकडून होणाऱ्या टीकेला ठाकरे गटाकडूनही प्रतिउत्तर देण्यास सर्वात झाली आहे. आता पुढील काही दिवस हे वाकयुद्ध रंगणार असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये