पुणे शहर

ससूनमध्ये ‘एचएमआयएस’ यंत्रणा बंद असल्याने कामकाजावर परिणाम

पुणे : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी ससूनसह राज्यातील सोळा वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील ‘एचएमआयएस’ सिस्टीम बुधवार पासून बंद करण्याचा आदेश दिला. त्यानंतर याचा ससून रुग्णालयातील कामकाजावर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये करणे, रुग्णाच्या रक्त व इतर वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल, क्ष-किरण अहवाल, सिटी स्कॅन यांचे अहवाल कागदावर देण्याऐवजी ते डिजिटल पद्धतीने ‘एचएमआयएस’ या सिस्टिमवर साठवले जात होते. ते अहवाल रुग्णाचा नोंदणी क्रमांक टाकल्यावर कोठेही पाहता येतात. यामुळे रुग्णांना व डॉक्टर यांना कागदी फाईल घेऊन फिरण्याची गरज पडत नाही. हा प्रकल्प राज्यातील सोळा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २००९ सुरू झाला होता . त्यानंतर रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या नोंदीपासून ते त्याच्या सर्व वैद्यकीय अहवालांची माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना मिळू लागली.

ससून रुग्णालयात बुधवारी सकाळी ओपीडी मध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यांचे रक्तनमुने डॉक्टरांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाईन द्यावे लागत होते. डॉक्टरांना वैद्यकीय चाचण्या कागदावर लिहून द्याव्या लागत आहेत. त्याचे अहवालदेखील कागदावर मिळतील.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये