पर्यावरण संवर्धनासाठी वटपौर्णिमेनिमित्त महिलांना वडाच्या झाडाच्या रोपांचे वाटप ; भाजप युवा मोर्चा कोथरूडचा उपक्रम
कोथरूड : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या रोपांचं वाटप कार्यक्रम कोथरूड मध्ये आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला माहिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, दीपक पवार, सायन देहाडराय, हर्षवर्धन खिलारे, साई थोरवे, सिद्धेश टेमकर, मंदार राजवाडे, पंकज गीते,आशिष सांगळे शुभम कनिच्छे उपस्थित होते.
सण हि साजरा व्हावा आणि पर्यावरणाचे संवर्धन ही व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे संयोजक भाजप युवा मोर्चाचे कोथरूड अध्यक्ष अमित तोरडमल यांनी सांगितले. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण करत महिलांनी वडाची झाडे लावावीत आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने हा कार्यक्रम राबवला गेला. महिलांनी आवर्जून वडाच्या झाडाची रोपे लावण्यासाठी नेल्याने उपक्रम साध्य झाल्याचे तोरडमल म्हणाले.