पुणे शहर

भाजप सरकार विरोधात पुणे शहर काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन.

पुणे : महाभ्रष्ट व निष्क्रिय भाजपा असा आरोप करत भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे‘चिखल फेको’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे.

Img 20240404 wa00162092919036315770776

NEET परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सरकारने धोक्यात आणले आहे. पब संस्कृती व ड्रग्जचे तरूणांमध्ये वाढते प्रमाण, महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, श्रीमंताची मुले नशेमध्ये धुंद होऊन दिवसाढवळ्या गोरगरीब जनतेला गाडीखाली चिरडत आहे, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही हे ‘चिखल फेको’ आंदोलन करीत आहोत.’’

Img 20240404 wa00127754739105663743070

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, आबा बागुल, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, चंदूशेठ कदम, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, संगीता तिवारी, साहिल केदारी, राधिका मखामले, अक्षय माने, संतोष पाटोळे, सुजित यादव, दिलीप तुपे, रविंद्र माझिरे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, अनिल पवार, मीरा शिंदे, शादरा वीर, सुंदरा ओव्‍हाळ, उषा राजगुरू, अर्चना शहा, वाल्मिक जगताप, प्रदिप पररेशी, सतीश पवार, द. स. पोळेकर, राज अंबिके, रवि ननावरे, राहुल तायडे, सुमित डांगी, सुरेश नांगरे, मुन्नाभाई शेख, अविनाश अडसूळ, रवि आरडे, विक्की खन्ना, मतिन शेख, क्लेमेंट लाजरस, भगवान कडू, अभिजीत महामुनी, नुर शेख आदींसह असंख्य काँग्रेसजण या आंदोलनास उपस्थित होते.

Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये