पुणे शहर

पालकांबरोबर दुचाकीवर शाळेत जाणाऱ्या ६०० विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप.. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना निमित्त उपक्रम

राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंगस्कूल मधील विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप

पुणे : जे शालेय विद्यार्थी आई वडिलांबरोबर दुचाकीवर शाळेत जातात अशा ८ वर्षा खालील ६०० विद्यार्थ्यांना आज हेल्मेट वाटप करण्यात आले. हे हेल्मेट मुलांसाठी खास हिरो मोटो क्रॉप कंपनी यांच्या वतीने तयार करण्यात आलेले आहेत. हे आयएसआय मार्कचे हेल्मेट असून ते वॉटर प्रूफ, इअरसेफ्टी अशी त्याची वैशिष्टे आहेत. परिवहन विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ संपन्न होत आहे त्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Distribution of helmets to 600 students going to school on two-wheelers with their parents.. Activities in Pune on the occasion of National Road Safety Month

Img 20230717 wa0012281298961742807603730839

यावेळी रस्ता सुरक्षा अभ्यासक व निवृत्त अधिकारी अनिल पंतोजी यांनी विद्यार्थ्यांना दुचाकीवर सोडणारे पालक व पाल्य या दोघांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचे उपयोग, फायदे व मोटार वाहन कायद्यामधील तरतुदी याचे मागदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जामुवंत मसलकर यांनी केले. हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे प्रयोजन राजू घाटोळे यांनी केले.

Img 20231112 wa00053541767882370111537

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर आबा बागुल, इंडियन हेड इन्जुरी फौंडेशन नवी दिल्ली कार्यकारी संचालकरणबीर तलवार, समन्वयक इंडियन हेड इन्जुरी फौंडेशन नवी दिल्ली गीता ठाकूर, सेफ इंडिया ओरिसाचे अध्यक्ष दिलीप कुमार पांडा, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे संजीव भोर, रस्ता सुरक्षा विभाग परिवहन आयुक्त कार्यालय अनिल वळीव, अमित बागुल, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली कदम व उपमुख्याध्यापिका अश्विनी ताठे उपस्थित होते.

Img 20240119 wa00073898454226800718818

यावेळी आबा बागुल म्हणाले की, रस्त्यावर सुरक्षित प्रवास करणे सर्वांची जबाबदारी आहे. हे चिमुकल्यांना या वयातच हेल्मेटचे महत्व कळल्यास ते प्रत्येकवेळी दुचाकीवर जाताना आई-वडिलांना सक्तीने हेल्मेट घाल्यास सांगतील व यातूनच जागृती होईल त्यामुळे सर्व शाळांच्या माध्यमातून हेल्मेटचे महत्व घरोघरी पोहचवता येईल. यासाठी शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

यावेळी अतिरिक्त परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील म्हणाले की, मुंबईच्या तुलनेत अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे दगावणाऱ्यांची संख्या पुणे शहरात जास्त आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. यामुळे शहरात विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. पुणेकरांनी स्वयंस्फुर्तीने हेल्मेटचा वापर करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले.

Img 20240120 wa00108526360471639881446

सदर कार्यक्रमाला विलास आपटे, निलेश गांगुर्डे, सुरज देवकर, ओमकार जाधव, गणेश बाजारे, पंढरीनाथ बुरघाटे, अनुज शिंदे, रुपाली बोरकर, संतोष बोरकर, निलेश रेणुसे, मनोज कोंडेकर, अमेंय आपटे, भरत गायकवाड मोटार ड्रायविंग स्कूल ओनर असो महाराष्ट्र राज्य चे संचालक उपस्थित होते. मोटर वाहन निरीक्षक रेहमा मुल्ला यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रतिज्ञा पालक व विद्यार्थ्यांना दिले. सूत्रसंचालन शाहीद जमादार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप दुरगुडे यांनी केले.

Img 20240120 wa00572661306229998441106
Img 20230511 wa0002282292969174931887579613
Fb img 17058116689734456722729440444596
Fb img 17058117418324121437191700473490
Img 20240120 1411245335154334332732265
Img 20240120 wa00096813043095854158068

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये