कोथरुड

यशवंतराजे प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड मधील पोलिसांना मास्क वाटप..

कोथरूड : कोथरूड पोलीस स्टेशन च्या अंकित कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यशवंतराजे प्रतिष्ठानच्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले. Distribution of masks to the police in Kothrud on behalf of Yashwant Raje Pratishthan.

यावेळी कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके साहेब, पोलीस अंमलदार विलास जोरी , दत्ता चव्हाण, विनायक पाडळे , सोनम भगत, पतीत पावन संघटना प्रांत संघटक सिताराम खाडे ,यशवंतराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश उभे, आकाश तापकीर, राहुल भिलारे, विशाल निगुणे, रोहित तोंडे, व यशवंतराजे प्रतिष्ठान चे इतर स्वयंसेवक उपस्थित होते.

IMG 20210223 WA0156

यशवंतराजे प्रतिष्ठान कायमच सामाजिक उपक्रम राबवत असते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या कोरोनाच्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांवर ही प्रचंड कामाचा ताण आहे. संकटाच्या काळात पोलीस कायमच समाजासाठी उभे राहत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हा मास्क वाटपाचा कार्यक्रम घेतल्याचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष रमेश उभे यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close