कोथरुड

घरेलू कामगार ह्या आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक – मृणाल कुलकर्णी.

कोथरूड : घरेलू कामगार महिला ह्या आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक असून त्या एक दिवस जरी आल्या नाहीत तरी आपण अस्वस्थ होतो. हे केवळ घरकाम करावे लागेल म्हणून नाही तर या भगिनींशी सगळ्या कुटुंबाचे एक नाते निर्माण झालेले असते म्हणून प्रत्येक कुटुंबात त्यांचे एक वेगळे महत्व आहे असे गौरवोदगार प्रसिद्ध सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी काढले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षातील कार्यकर्त्यांकडून एक महिना सेवा कार्याला समर्पित करण्यात आला आहे. त्याला अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सारथी ग्रुपच्या वतीने घरेलू कामगार महिलांना छत्री व रेनकोट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.

ह्या महिलांना छत्री व रेनकोट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जात आहे असे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले. कोरोना काळात घरेलू कामगारांनी जीव धोक्यात घालून केलेले कार्य वंदनीय असून त्यांच्यामुळे अनेक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांग यांचा हा काळ सुखावह झाला असेही ते म्हणाले. घरेलू कामगारांमुळे घराघरात सामाजिक समरसता चा आदर्श दिसून येतो असेही आ.सिद्धार्थ शिरोळे म्हणाले.

पावसाळ्यात घरेलू कामगार महिला स्वतःचा विचार न करता अनेकदा भिजत कामावर जातात, यातून त्या आजारी ही पडतात मात्र त्या दुखणे अंगावर काढतात, अश्या परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Img 20220521 wa0000

यावेळी शहर सरचिटणीस दत्तात्रय खाडे, नगरसेविका व माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, सारथी ग्रुपचे संस्थापक आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपा शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिवाजीनगर मंडल अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, निलेश गरुडकर, ॲड. प्राची बगाटे, अभिजित मोडक, प्रकाश सोळंकी, अजय दुधाणे, दत्तात्रय फंड, शामराव मारणे,भाजपा आयटी सेल च्या संयोजिका कल्याणी खर्डेकर, संगीताताई शेवडे, निलेश घोडके, रमेश गिरमकर, योगेश जोगळेकर, दिनेश अंबुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, आपटे रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरातील 200 घरेलू कामगार भगिनींना छत्री व रेनकोट वाटप करण्यात आले. मंजुश्री खर्डेकर आणि श्री.सुनील पांडे यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट केली. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तर अभिजित मोडक यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये