पुणे शहर

उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्यात अडचणी..नागरिकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी किरण दगडे पाटील यांनी पालिकेकडे केली ही मागणी

कोथरूड : चांदणी चौक, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, भूगाव रोड, भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, वनाज आणि पौड
रस्त्यांसह या परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याच्या पुरवठ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. टँकर पॉईंट लांब असल्याने त्याने पाणीपुरवठा करण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे चांदणी चौक येथे नवीन टँकर पॉईंट चालू करण्याची मागणी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केली आहे.

किरण दगडे पाटील यांच्याकडून या मागणीचे निवेदन पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहे. चांदणी चौक, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, भूगाव रोड, भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, वनाज आणि पौड रस्ता परिसरातील अनेक भागातील नागरिकांना उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेकडून टँकरनेही पाणीपुरवठा व्यवस्थित व वेळेवर होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

सद्यस्थितीत पटवर्धन बाग दिनानाथ हॉस्पिटल जवळ असलेल्या टँकर पॉईंट येथून मोफत टँकर पाणीपुरवठा केला जातो, परंतु हा टँकर भरणा पॉईंट चांदणी चौकापासून ७ ते ८ किलोमीटर लांब आहे, यामुळे भरून येण्यास जास्त वेळ लागतो ज्यामुळे टँकर च्या ट्रिप कमी होतात आणि नागरिकांची पाणी मागणी पूर्ण होत   नसल्याचे किरण दगडे पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे.

सदर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गरज लक्षात घेता, चांदणी चौकाच्या पाणी टाकीच्या ठिकाणी नवीन टँकर पॉईंट स्थापन करून देण्यात आला तर या सुविधेमुळे परिसरातील नागरिक वसाहत व सोसायट्यांना नियमित, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होईल. त्यामुळे या मागणीचा तातडीने विचार करून कार्यवाही करण्याची विनंती किरण दगडे पाटील यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये