पुणे शहर

कर्वेनगरकरांची दिवाळी पाडवा पहाट लतादीदींच्या गीतांनी ठरली संस्मरणीय..

कर्वेनगर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गीतांनी आज कर्वेनगर वासियांची दीवाळी पाडवा पहाट सुरमयी स्वरांनी संस्मरणीय ठरली. दिवाळी पाडवा निमित्त भारतरत्न गानसम्राजी स्व. लता मंगेशकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा मागोवा घेत त्यांना मानवंदना देणारा मराठी आणि हिंदी अजरामर गीतांचा सुरेल कार्यक्रम कर्वेनगर मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सादर झालेल्या लतादीदींच्या गीतांनी उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

Img 20221026 wa0510

माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या वतीने या दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक मीनल फडके पोंक्षे, मालविका दीक्षित, अजित विसपुते, रमा कुलकर्णी यांनी लतादीदींची गाणी सादर करत उपस्थित रसिकांची दाद मिळवली.

Img 20221026 wa0008

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा याबरोबरच राम कदम यांचे संगीत आणि जगदीश खेबूडकर यांचे गीत असणारे पिंजरा चित्रपटातील दे रे कान्हा, चोळी अन्‌ लुगडी, ना. धों. महानोर लिखित व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हांविण बाई, या लतादीदींच्या सादर झालेल्या गीतांनी दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरली.

Fb img 1666758243328
Fb img 1666767114872

या बरोबरच महल या हिंदी चित्रपटातील आएगा आएगा आनेवाला, गाईड मधील पिया तोसे नैना लागे रे, नैना लागे रे, परख चित्रपटातील ओ सजना, बरखा बहार आयी या गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. ए मेरे वतन के लोगो या लता दीदींच्या देशभक्तीपर अजरामर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या संगीत मैफलीत वादक म्हणून प्रसन्न बाम, विशाल गंडूतवार, अजय अत्रे, सचीन जांभेकर यांनी साथ दिली तर अभिजीत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

यावेळी नेपाळ येथील तायक्वांदो जी टू स्पर्धेत कर्वेनगरमधील शिवानी भिलारे हीचा सिल्व्हर पदक मिळवल्याबद्दल तसेच सिंहगडावर १ हजार 7 वेळा ट्रेकिंग केलेल्या 72 वर्षीय उत्तमराव ओवले यांचा यावेळी लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

Fb img 1666533939031
Fb img 1666767066281
Png 20221024 133102 0000 1
Img 20221019 143448 4921652329476299347948
Img 20221026 wa0385
Fb img 1666767096273
Img 20211101 wa00118330850860855581379
Img 20221023 wa0081
Fb img 1666767181346
Fb img 1666767140007
Img 20211031 wa00066985050640051471264
Wp image5754610395278315591
Img 20221021 wa0478
Img 20221021 wa0325
13bbf55a 43bc 4d02 818a 2d982285f761 1
Img 20221021 wa0474
Img 20221022 104615 9662214124455291312590
Img 20221026 wa0189
Img 20221023 wa0082
Img 20221022 104611 6206281284427559282707
Img 20221026 190314 855
Img 20221021 wa0416
Img 20221021 wa00118605235200493211119
Img 20221020 wa00071429831687423321840
Screenshot 2020 1113 1558146592854911118712363
Fb img 1666593719680
Img 20221026 wa0014
Img 20221022 wa0300

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये