महाराष्ट्र

महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद प्रकृती बिघडल्याने रद्द ; ईडीकडून आज हजर राहण्याचे खडसे यांना समन्स..

मुंबई : पूर्वीचे भाजपचे आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ED ईडीने आज गुरुवारी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. कार्यालयात जाण्याअगोदर खडसे पत्रकार परिषद घेणार होते. त्यामुळे या पत्रकार परिषदेत खडसे काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, पण ही पत्रकार परिषद खडसे यांची प्रकृती बिघडल्याने रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. Eknath Khadse’s press conference canceled

बुधवारी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही तासातच खडसे यांना समन्स बजावत आज गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे खडसे यांच्या समोरील अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.

खडसे यांना अटक केली जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत खडसे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषद रद्द झाल्याने अनेक तर्क काढले जात आहेत. 

Img 20210707 wa0004

राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्या मागे ईडी लावण्याचा प्रकार चालू असून त्यांनी ईडी लावली तर मी सिडी लावेन असा इशारा खडसे यांनी दिला होता. त्यामुळेच या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. प्रकृती बिघडल्याने आता खडसे ईडी कर्यायात जाणार का हे पहावे लागणार आहे.

महसूल मंत्री असताना खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये