भारतीय रेल्वे समिती सदस्यपदी किरण दगडे पाटील यांची निवड

पुणे : भारतीय रेल्वे समितीच्या सदस्यपदी किरण दगडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. किरण दगडे पाटील यांनी आतापर्यंत रेल्वे सुरक्षितता व सुधारणेबाबत काम केले आहे. दगडे यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड रेल्वे बोर्ड प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशात रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात तर मोठ्या प्रमाणात माल वाहतूकही होत असते. भारतीयांसाठी रेल्वे हे प्रमुख प्रवासाचे माध्यम आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे समिती सदस्यपदी निवड होणे ही एक मोठी जबाबदारी असून ती यशस्वी पणे पार पाडण्यासाठी माझा प्रयत्न राहील. रेल्वे प्रवाशांना जाणवणारे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय रेल्वे, कोळसा, खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मार्गदर्शन मला कायम मिळत आले असून त्यांच्या सूचनांनुसार काम करणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना सांगितले.







